मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक सुरू. राज्यातील खरीप हंगाम, पाऊस -पाणी आणि पीकविमा याबाबत आढावा घेण्यात येत आहे.
श्री एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कुर्ला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे.जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचेही निर्देश दिले आहेत.
शापूरजी पालोनजी उद्योग समुहाचे अध्यक्ष पालोनजी मिस्त्री यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देशाच्या औद्योगिक क्षेत्राच्या जडणघडणीत योगदान देणारे मार्गदर्शक असे व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सामाजिक समतेचे अग्रदूत, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले. जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेला "सामाजिक न्याय दिन" व त्यातील सर्व उपक्रमांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
जनतेची कामे तातडीने माझ्याकडे घेऊन या!
लोकांचे प्रश्न सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व विभागीय सचिवांच्या बैठकीत विविध कामांचा आढावा घेतला.
CM Uddhav Thackeray ji extended his congratulations to Minister Dr. @NitinRaut_INC and the entire @MEDAOfficial1 team on being honoured with the Star of Governance- ‘Scotch Award in Power & Energy’, setting a new benchmark in the field.