भारतीय स्वातंत्र्याची गौरवशाली ७५ वर्षे आपण साजरी करत आहोत. स्वातंत्र्य चळवळीत आपल्या पूर्वसूरींनी तनमन अर्पून लढा दिला. लाठ्या-काठ्या, तुरुंगवास आणि प्रसंगी गोळ्याही झेलल्या. हुतात्म्यांच्या या समर्पणातूनच स्वातंत्र्याची पहाट उगवली. #Tiranga #तिरंगा #AzadiKaAmritMahotsav
5
27
3
257
आणि मग गेल्या पाउणशे वर्षांत देशाने अनेक क्षेत्रांत प्रगतीची दालनं खुली केली. इथे धरणं उभी राहिली, गावागावात वीज पोहोचली, हरितक्रांतीने इथल्या शेती, बागांमध्ये हसू फुललं. आपल्या देशात कामगारांच्या घामातून उद्योग उभे राहिले. शहरं रोजगाराची केंद्र झाली. ग्राहक राजा झाला.

Aug 11, 2022 · 4:30 PM UTC

1
4
25
जागतिकीकरणाचा पाळणा हलू लागला. सांस्कृतिक वैभव विकसित झालं आणि इथल्या क्रीडाक्षेत्राला नवे धुमारे फुटले. लाल मातीतल्या पैलवानांनी ऑलिम्पिकची सुवर्णस्वप्न दाखवली, प्रगतीचे मिल्खा सुसाट धाव घेत निघाले. हॉकीतले ध्यानचंद आणि क्रिकेटमधले कपिल चषक उंचावू लागले. #आज़ादी_का_अमृत_महोत्सव
1
6
28
आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रगीतासह जेव्हा जेव्हा तिरंगा लहरू लागला तेव्हा तेव्हा देशाचा उर अभिमानाने भरून येऊ लागला. अनेक धर्मीयांच्या, अनेक संस्कृतींच्या, अनेक भाषिकांच्या एकात्मतेचे प्रतीक म्हणून आज आपला तिरंगा राष्ट्रध्वज दिमाखाने लहरत आहे.
1
5
31
त्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान आहे. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला आता या तिरंग्याचा मळवट मिरवायचाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सर्व पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना आवाहन करण्यात येत आहे की
1
9
81
आपल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रोफाइल पिक्चर म्हणून भारताचा राष्ट्रध्वज ठेवावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया अकाउंटचे प्रोफाइल पिक्चर आणि कव्हर पिक्चर त्यानुसार बदलण्याबाबत सूचित करण्यात येत आहेत.
2
12
1
86