President of Nationalist Congress Party

Joined October 2013
'प्रेम, बंधुता आणि सद्भावनेने जीवनातील प्रत्येक संघर्षाला सामोरे जाता येते', हे स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. भारतीय तत्त्वज्ञानाचा विश्वामध्ये प्रसार करणारे महान तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
46
89
4
1,281
मी १९६७ पासून शपथा पाहिल्या आहेत. १९७२ ते १९९० पर्यंत मीसुद्धा शपथा घेतल्या. परंतु कुठल्याही राज्यपालांनी मला पेढा भरवला नाही. शपथ चुकीची होत असताना राज्यपालांनी दुर्लक्ष केले आणि पेढा भरवून फुलांचा गुच्छ देताना आपण पाहिले. चला आनंद आहे एकंदरीत त्यांनी कार्यपद्धतीत बदल केला.
581
1,138
72
10,105
मी अमुक अमुक बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरून वगैरे वगैरे ते बोलले. ही शपथ दिली कुणी, तर राज्यपाल यांनी दिली. आमचे सरकार आले त्यावेळी मी पहिल्या लाइनमध्ये बसलो होतो. आमच्या एका सदस्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतरांना स्मरण करून शपथेला सुरुवात केली तर...
66
309
10
3,326
त्यांना याच राज्यपालांनी परत शपथ घ्यायला लावली आणि माझ्या नावाचा उल्लेखही केला. मात्र कालच्या शपथेवेळी श्रीमान राज्यपाल कोश्यारी यांनी हरकत घेतली नाही याचे आश्चर्य वाटते. bit.ly/3bGUIYO
11
182
1
1,868
आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे मंत्रिमंडळाचा प्रस्ताव करून पाठवला होता. मुळात मंत्रिमंडळाने दिलेल्या प्रस्तावाला राज्यपालांनी मान्यता देणे हे बंधनकारक असते असं असताना जवळपास अडीच वर्ष त्यांनी तो प्रस्ताव तसाच ठेवला व कोणताही निर्णय घेतला नाही.
13
190
1
1,808
राज्यपालांचा हा निर्णय लोकशाहीला कितपत योग्य आहे याची चर्चा करायची गरज नाही लोकांना हे सर्व ठाऊक आहे. आता १२ आमदारांबाबत राज्यपाल निर्णय घेणार आहेत असे ऐकले आहे.
8
158
1,627
एक गोष्ट स्पष्ट होईल की एका सरकारने अधिकृतपणे मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊन नावे दिली होती. त्यावर अडीच वर्षांमध्ये कोणतीही कार्यवाही केली नाही आणि नवं सरकार आल्यावर त्यांच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही केली जात असेल तर...
3
140
1
1,484
जी शपथ आम्ही घेतो, माझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती कुठल्या एका बाजूची आहे हे न पाहता निरपेक्षपणे निकाल देईन... परंतु आताचे राज्यपाल निरपेक्षपणाची जी व्याख्या देशवासीयांसमोर ठेवत आहे हे आपण निरपेक्षपणे पाहत आहोत.
6
152
1,625
विधानसभा अध्यक्षपद निवडणूक वा सभागृहातील बहुमत असेल, पक्षाचा व्हिप पाळावाच लागतो. तो पाळला नाही तर काय होईल. पक्ष म्हणजे काय एक विधिमंडळ पक्ष आणि दुसरा पक्ष संघटना त्यात घटनेने ज्या दिलेल्या तरतुदींमध्ये (राज्य, जिल्हा, तालुका ते गावपातळीवर) अधिकार हे घटनेचे चित्र अंतिम आहे.
10
144
1
1,475
त्यानुसार पाहिले तर आता असं दिसतं की, ते एका बाजूला आहे आणि विधिमंडळाची कमिटी एका बाजूला दिसते आहे. त्यामुळे न्यायालयात काय होईल माहीत नाही. अशी शक्यता नाकारता येत नाही की विधिमंडळ पक्षाची एकंदरीत संख्या पाहता तो दुर्लक्षित करता येत नाही.
19
147
1
1,670
सभागृहाचे अध्यक्ष निर्णय घेतात ते कसे व कधी घेणार हे माहीत नाही त्यामुळे अध्यक्षांच्या मनात काय आहे त्यावर चित्र स्पष्ट होईल किंवा तो निर्णय सुप्रीम कोर्टात ठरेल.
50
143
1
1,789
खेळाडूंना मदत करणे म्हणजे, काही खेळाडू हे जिल्हा पातळीवर चमकतात, काही राज्यपातळीवर तर काही देश पातळीवर चमकतात. जो राज्यपातळीवर चमकतो तो देशपातळीवर जायला त्याच्यात एक टॅलेंट असू शकते, जो देशपातळीवर चमकतो त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याची गुणवत्ता असते. अशांना मदत करावी लागते.
1
23
168
हे खेळाडू सामान्य कुटुंबातील असतात. ज्यांना सहाय्य केले त्यात अर्जुन पुरस्कारप्राप्त पै. राहूल आवारेंमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पोटेन्शिअल आहे. पै. उत्कर्ष काळे, पै. अभिजीत दटके, पै. किरण भगत, पै. सदगीर अशा सर्व मल्लांना प्रशिक्षण व खुराकासाठी प्रत्येकी १२ लाख दिले होते.
3
26
194
हे काम आयुष्यात पहिल्यांदा मी जाहीर सांगतोय. यासंबंधी वादाचा प्रश्न निघाला त्यामुळे या गोष्टी सांगाव्या लागल्या. श्रीरंग राक्षे हा उत्तम खेळाडू जखमी झाल्याने वर्षभर वैद्यकीय उपचारासाठी २५००० महिना सहाय्याची भूमिका घेऊन राबवली. हे काम आमच्यासारख्यांचे आहे बाकीच्यांचे नाही.
2
27
173
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेमध्ये या कामासंबंधी कोणाचीही तक्रार नाही. असे असताना बरखास्तीचा निर्णय का घेतला तर कुस्तीगीर परिषदेचे संघटनात्मक व क्रीडाविषयक काम बघणाऱ्यांच्या काही तक्रारी पुणे जिल्ह्यामध्ये आल्या. काही तक्रारी राष्ट्रीय संघटनेकडे गेल्या.
2
24
174
या तक्रारीसंबंधी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेने काय उपाययोजना केली याची माहिती अद्याप मला नाही. पण राष्ट्रीय पातळीवर चौकशी करण्यामागचे कारण विचारले असता त्यांच्या पातळीवर महाराष्ट्र संघटनेच्या कार्यपद्धतीवर काही तक्रारी आल्या.
2
24
163
व दुसरे कारण राष्ट्रीय संघटनेने स्पर्धा घेण्याचे जे टाइमटेबल करून दिले होते, त्यामध्ये महाराष्ट्र संघटनेने जेवढी पावले टाकायला हवी होती तेवढी टाकलेली नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. या सगळ्या गोष्टींमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
1
21
135
या कारवाईमागे कोणते राजकारण आहे अशा बातम्या सुरू होत्या. मात्र यात कोणतेही राजकारण नाही. पक्षीय विषय यात येत नाहीत. माझ्यासारखे अनेक राजकारणातील लोक क्रीडा संघटनेत आहेत. वेगवेगळ्या विचारांचे व पक्षाचे लोक यात आहेत. पण आम्ही यात कोणतेही राजकारण आणत नाहीत.
1
20
153
यामध्ये महाराष्ट्राचे दोन तीन लोक महत्त्वाचे आहे. एक मी स्वत: त्यानंतर खासदार रामदास तडस व कुस्तीक्षेत्रात काम करणारे काका पवार तसेच अन्य पदाधिकारी आम्ही एकत्रित बसून राज्यपातळीवर दुरुस्ती करण्याची आवश्यकता असेल तर ती दुरुस्ती करू.
4
28
278
काही गैरसमजुतीने निर्णय घेतला असेल तर राष्ट्रीय संघटनेच्या प्रमुखांशी विचारविनिमय करून यातून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला बाहेर कसे काढायचे याचा विचार करू. राज्यामधील कुस्तीपटूंच्या खेळावर, भवितव्यावर या निर्णयाचा यत्किंचितही परिणाम होणार नाही ही खबरदारी आमच्याकडून घेतली जाईल.
5
25
273
Show this thread